मुंबई : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी येथे आजपासून स्क्रिनिंगला सुरूवात करण्यात आलाी आहे. कारण मुंबईला कोरोनाचा धोका सर्वात जास्त धारावी येथून आहे. आतापर्यंत धारावीत कोरोनाबाधित चार रूग्णांचे मृत्यू झाले आहे .


इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर्स आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं स्क्रिनिंग सुरु आहे. यासाठी एकूण 10 टीम तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक टीममध्ये पाच जण असणार आहे. यामध्ये 2 डॉक्टर्स, 1 नर्स आणि महापालिकेचे 2 कर्मचारी असणार आहेत. पहिल्या टप्प्यात पन्नास हजार लोकांचं स्क्रिनिंग होणार आहे. येत्या 8 ते 10 दिवसात हे स्क्रिनिंग होणार आहे.धारावी ही दाटीवाटीची वस्ती आहे. त्यामुळे या ठिकाणी आता तातडीने स्क्रिनिंग सुरु करण्यात आलं आहे. मुंबईकरांना सर्वतोपरी काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी वांद्रे पूर्वमध्येही 11 हजार 262 कुटुंबातल्या 45 हजार जणांचं स्क्रिनिंग करण्यात आलं आहे. वांद्रे येथील गोळीबार रोड, शांतीलाल कंपाऊंड, वाकोला येथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.


धारावीत फ्लॅगमार्च


गेल्या काही दिवसात धारावी विभागात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या या विभागात लोकसंख्या मोठी असून अतिशय दाट वस्ती आहे. त्यामुळे येथे संचारबंदी सक्तीने राबविण्यासाठी तसेच लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी या विभागात पोलिसांनी फ्लॅग मार्च काढला होता. यामध्ये या विभागातील उपायुक्त यांच्यासह विविध फोर्स या मार्चमध्ये सामिल झाले होते. या वेळी ड्रोनच्या, स्पीकरच्या सहाय्याने पोलिसांनी जनजागृती केली. तसेच या फ्लॅग मार्च मधून पोलिसांनी आपली ताकद देखील दाखवली.


आतापर्यंत राज्यात 33 हजार कोरोना चाचणी करण्यात आल्या आहेत. यातील एकट्या मुंबईत 19 हजार टेस्ट करण्यात आल्या आहेत. राज्यातील एकही रुग्ण सुटता कामा नये, हा यामागील उद्देश. हे रुग्ण मुंबई, एमएमआर (MMR) आणि उपनगर या भागात 91% रुग्ण. यात 61% मुंबईत तर 20% पुण्यात आहेत. तर उर्वरित 10% एमएम आर (MMR) मध्ये आहे. ह्या तीन भागत सोडून उर्वरित राज्यात केवळा 9 टक्के कोरोना बाधित आहेत.


संबंधित बातम्या :



महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय



Mumbai Corona Update | महाराष्ट्रातील कोरोनाचे 60% रुग्ण मुंबईत, दादरमध्ये कोरोनाचे 5नवे रुग्ण, धारावीत वृद्धाचा मृत्यू