मुंबई : एकेकाळी पर्यटन क्षेत्रात नावजलेल्या थॉमस कुक कंपनीनं नुकतीच आर्थिक दिवाळखेरी जाहीर केली आहे. त्यातच त्यांना ग्राहक तक्रार निवारण मंचानेही चांगलाच दणका दिला आहे. मुंबईतील एका ग्राहकाला अपुरी सेवा दिल्याप्रकरणी ग्राहक तक्रार निवारण मंचने थॉमस कुकला नुकसानभरपाई म्हणून 4 लाखाचा दंड आकारला आहे. तक्रार निवारण मंचच्या या आदेशामुळे अखेर पाच वर्षानंतर ग्राहकाला दिलासा मिळाला आहे.
अनंत कोर्डे यांनी आपल्या कुटुंबियांना परदेशाची सैर घडवून आणण्यासाठी मे 2014 मध्ये ग्रॅण्ड बारगेन युरोप टुर बुक केली होती. त्यासाठी त्यांनी कंपनीकडे 2.5 लाख रुपये आगाऊ रक्कम भरली. या कौटुंबिक सहलीसाठी एकूण 9 लाख 40 हजार रुपयांचं पॅकेज त्यांना देण्यात आलं होतं. कोर्डे यांना लंडन ते पॅरिसचा प्रवास युरोस्टार ट्रेनमार्फत करायचा होता त्यांची ही अट कंपनीने मान्यही केली होती. त्यानंतर कंपनीकडे कोर्डे यांनी बुकींगची माहिती मागितली. तेव्हा टूरच्या आठवडाभर आधी ही माहिती देण्यात येईल, असे त्यांना त्यांना कळविण्यात आले. कौटुंबिक सहलीदरम्यान 'युरोस्टार' रेल्वे मार्फत प्रवास करता येणार नाही, कारण व्हिसा प्रोसेसिंगसाठी जास्त वेळ जाणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यावेळी कोर्डे यांनी ही टूर रद्द करण्याचा निर्णय घेत अॅडव्हान्स दिलेले पैसे त्यांनी कंपनीकडे परत मागितले. मात्र कंपनीने त्यांना संपूर्ण रक्कमेएवजी 1 लाख 62 हजार 374 रुपये दिले.
याविरोधात दाद मागण्यासाठी कोर्डे यांनी ग्राहक तक्रार निवारण मंचकडे धाव घेतली. याची दखल घेत तक्रार निवारण मंचने थॉमस कुकला 9 टक्के व्याजासहीत 2.5 लाख रुपये कोर्डे यांना देण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे तर मानसिक त्रासापोटी 1 लाख रुपये देण्याचेही आदेश दिले आहेत.
दिवाळखोर थॉमस कुकला ग्राहक मंचचा दणका, ग्राहकाला 4 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
26 Oct 2019 10:47 PM (IST)
थॉमस कुक कंपनीला ग्राहक तक्रार निवारण मंचाने चांगलाच दणका दिला आहे. मुंबईतील एका ग्राहकाला अपुरी सेवा दिल्याप्रकरणी ग्राहक तक्रार निवारण मंचने थॉमस कुकला नुकसानभरपाई म्हणून 4 लाखाचा दंड आकारला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -