मुंबई : राजस्थानमध्ये घडलेल्या घडामोडींचे थेट पडसाद आता महाराष्ट्रावर पडतायत. सचिन पायलट यांच्यावर केलेल्या कारवाईनंतर महाराष्ट्रातले काही नेते काँग्रेसच्या निशाण्यावर आहेत. सचिन पायलटच्या यांच्या बाजूनं बोलल्यानं प्रवक्ते संजय झा यांना काँग्रेसनं तातडीनं पदावरुन काढून टाकलं. पक्षविरोधी भूमिका घेणे, महाविकास आधाडीतल्या घटक पक्षांवर टीका करणे, पक्षांतर्गत घडामोडी चव्हाट्यावर आणणे. असे प्रकार आता काँग्रेसमध्ये चालणार नाहीत. हे संजय झा यांच्या रूपानं इतरांना दिलेला इशाराच आहे, त्यामुळे अशा काँग्रेसच्या वाचाळवीरांवर कारवाईची टांगती तलवार आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादीनं काँग्रेसच्या संजय निरुमप यांच्याबद्लची नाराजी आधीच वरिष्ठाकडे व्यक्त केली आहेत. त्यात मिलिंद देवरा, प्रिया दत्त आणि नसीम खान यांचीही नावं आहेतच. काँग्रेसच्या या नेत्यांपैकी काही जणांवर भविष्यात कारवाई झालेली दिसू शकते.
'भाजपमध्ये जाणार नाही, काही लोकांनी अफवा पसरवली' : सचिन पायलट
संजय निरुमप यांनी काय ट्वीट केलंय.
मुंबई काँग्रेस नेत्यांनी माझ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारण, राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना नेत्यांच्या जमीन घोटाळ्याची मला चौकशी करायची होती. शिवसनेविरोधात बोलणे पक्षविरोधी कृती आहे का? मुंबई काँग्रेस शिवसेनेत विलीन झाली आहे का?
संजय निरुपम यांच्यावर कारवाईसाठी मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी वरिष्ठांकडे रिपोर्ट पाठवला आहे. महाविकास आघाडीत काही काँग्रेसचे नेते वितुष्ट निर्माण करायचा प्रयत्न करतायत. त्यांच्यावर कारवाईची मागणी होतेय. त्याची कारणंही तशीच आहे, तिन भिन्न विचारधारेचे पक्ष एकत्र आल्यानंतर सरकार चालवणं म्हणजे तारेवरची कसरत असते. त्यात काँग्रेस नेत्यांचीच काँग्रेस किंवा सराकरवर टीका म्हणजे पक्षविरोधी मोहिम चालवल्यासारखंच आहे.
आपण पाहुयात काँग्रेस नेत्यांनी काय काय टीका केली होती
- संजय निरूपम यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री 2 मध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप केलाय.
- मिलिंद देवरा : चीनप्रकरणात ट्वीटरवरून काँग्रेसला घरचा आहेर दिला.
- प्रिया दत्त : सचिन पायलट यांच्यावर कारवाईनंतर ट्वीटरवरून नाराजी वक्त केली.
आता यापुढे पक्षविरोधी किंवा सरकारविरोधी वक्तव्य जे कोण करतील त्यांचे एआयसीसीकडे व्हिडिओ क्लिपिंग्ज आणि वृत्तपत्रांची कात्रणं सादर केल्या जाणार आहेत. म्हणजे दुध का दुध और पाणी का पाणी सिद्ध करण्यात वरिष्ठांना मदत होईल. महाविकास आघाडीचं सरकार किती दिवस चालेल यांवर आधीच प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय. त्यात काँग्रेसच्या नेत्यांच्या टीका हे सराकराला सुरुंग लावण्यासारखं आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून काँग्रेसच्या काही नेत्यांवर कारवाईची शक्यता आहे.
Rajasthan Crisis | राजस्थान हायकोर्टात सचिन पायलट यांचं अपिल, मुकुल रोहतगी, हरिश साळवे बाजू मांडणार