'10 दिवसांपूर्वी मी सोनिया गांधींना भेटून निवृत्तीचा विचार बोलून दाखवला. त्यानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाही पत्र पाठवून निवृत्तीबद्दल माहिती दिली. मात्र त्यांच्याकडून कुठलंही उत्तर आलं नाही. त्यानंतर मी काँग्रेस आणि राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.' असं गुरुदास कामत यांनी दिलेल्या निवदेनात म्हटलं आहे.
येत्या काही महिन्यात मुंबईत महापालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्याआधीच गुरुदास कामत यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानं राजकारणातून संन्यास घेतल्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढू शकते.
गुरुदास कामत यांचा राजकीय प्रवास:
1976 साली एनएसयूआयचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती
1984 साली पहिल्यांदा काँग्रेसकडून लोकसभेवर
पाच वेळा ईशान्य मुंबईमधून लोकसभेत प्रतिनिधित्व
2009 ते 2011 यूपीए सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम
केंद्रीय गृहखातं आणि दूरसंचार मंत्रालयाचाही अतिरिक्त कारभार
2014 साली सेनेच्या गजानन किर्तीकरांकडून कामतांचा पराभव