मुंबई: नागराज मंजुळेच्या 'सैराट' सिनेमातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला परशा अर्थात आकाश ठोसर आता नव्या इनिंगला सज्ज झाला आहे. त्याची ही नवी इनिंग रंगणाराय थेट महेश मांजरेकरसोबत.
महेश मांजरेकरने आकाशला त्याच्या नव्या सिनेमासाठी कास्ट केलं आहे. या सिनेमात तो हिरो म्हणून झळकणार आहे.
या सिनेमाचं नाव जाहीर केलं नसलं तरी शुटिंग मात्र सुरु झालं आहे. मुंबईतल्या गोरेगांव फिल्म सिटीमध्ये सध्या परशा शूटिंग करतोय.
त्यामुळे 'सैराट'ला मिळालेलं सैराट यश फक्त सिनेमापुरतंच मर्यादित राहिलं नसून, त्याचा परीसस्पर्श यातल्या कलाकारांनाही झालाय असंच म्हणावं लागेल.