मुंबई : अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने देशातील विविध धार्मिक स्थळांच्या ट्रस्टमध्ये पडून असेलेलं सोनं ताब्यात घ्यावं आणि कोरोनाच्या संकटात देश उभा करण्यासाठी त्याचा वापर करावा, असा सल्ला माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले. सध्या देशात इतकी वाईट परिस्थिती नाही की मंदिरातील सोन्याला हात लावावा. पृथ्वीराज चव्हाण यांनी हा प्रयोग पहिल्यांदा काँग्रेसशासित राज्यात राबवून दाखवावा. सोबतचं काँग्रेस नेत्यांना पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन चव्हाण यांनी करावे, पंतप्रधान मोदी सुद्धा ही योजना स्वीकारतील, असे उत्तर मुनगंटीवार यांनी दिले आहे.


कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशभरात वाढतच आहे. गेल्या 50 दिवसांपासून देश लॉकडाऊन आहे. याचा मोठा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही झाला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने देशातील विविध धार्मिक स्थळातील ट्रस्टमध्ये पडून असेलेलं सोनं ताब्यात घ्यावं आणि कोरोनाच्या संकटात देश उभा करण्यासाठी त्याचा वापर करावा, असा सल्ला माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे. त्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले.


देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोनं सरकारने कर्जाने ताब्यात घ्यावं : पृथ्वीराज चव्हाण


सुधीर मुनगंटीवार यांचे आरोप


सध्या असा निर्णय घेण्याची गरज नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी असा सल्ला देण्याअगोदर काँग्रेसशासित राज्यात हा प्रयोग करावा. मंदिरातील सोनं ही देशाची संपत्ती आहे. जेव्हा देशावर संकट येईल, त्यावेळी देवाच्या संपत्तीचा उपयोग आपण गरिबांसाठी करु शकतो. राज्यसभेमध्ये 70 च्या वर असे खासदार आहेत. ज्यांच्या कंपनीतील एकत्रित संपत्ती कोट्यवधी रुपये आहे. अशावेळी देवाच्या अगोदर देवाच्या भक्तांनी मदत करण्याची गरज आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी अशी काही योजना आणली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील ही योजना स्वीकारतील. काँग्रेसचे अनेक खासदार मंत्री राहिलेले लोक आहेत. अशा लोकांनी पुढे यावे. आपण सर्वांचा भाग किती असेल हे ठरवू. मी देखील आमदार आहे. मीसुद्धा माझा वाटा देतो. त्यामुळे कारण नसताना देवाला मध्ये आणायचं काही कारण नाही, अशी प्रतिक्रीया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.


पृथ्वीराज चव्हाण यांचे उत्तर
मी माझ्या ट्विटमध्ये कोणत्याही विशिष्ट धर्माचा उल्लेख केला नव्हता. देशातील अनेक धार्मिक स्थळांमध्ये कोट्यवधी रुपयांचे सोनं पडून आहे. या सोन्याचा वापर आपण करू शकतो, असा सल्ला मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला होता. भाजप नेते माझ्या या वक्तव्याचा अर्थ चुकीचा काढून गळे काढत असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. सध्या देशात स्थलांतरित मजुरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत भाजप नेते काँग्रेस नेत्यांचा मंदिरावर डोळा असल्याचे आरोप करत असल्याचे चव्हाण म्हणाले.


Prithviraj Chavan EXCLUSIVE | मंदिराच्या सोन्यावरून संघर्ष, पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपवर पलटवार!