मुंबई : ‘महापरीक्षा’ पोर्टल बंद करण्याची मागणी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी केलीय. ‘महापरीक्षा’ हे पोर्टल स्पर्धा परीक्षांचे ढिसाळ नियोजन करुन, परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय.

महापरिक्षा पोर्टलद्वारे गेल्या काही महिन्यात अन्न व पुरवठा निरीक्षक, राज्य गुप्त वार्ता अधिकारी, नगरपरिषद, नगरपंचायत भरती या परीक्षा घेण्यात आल्या. मात्र, यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना अडचणी आल्या असून, त्या अडचणी सोडविण्यासाठी फोन, ईमेलचा काहीही अर्थ नसल्याचं समोर आलंय.

महापरीक्ष पोर्टलबाबत विद्यार्थ्यांच्या नेमक्या तक्रारी काय?

  • बैठक व्यवस्था सामूहिक कॉपी करता येईल अशी आहे.

  • संगणक, माऊस परीक्षा सुरु असताना बंद पडणे

  • प्रश्नपत्रिका दिलेल्या अभ्यासक्रमाप्रमाणे नसणे

  • दिलेल्या वेळेव्यतिरिक्त सुद्धा लॉग इन करुन पुन्हा पेपर सोडवला जाऊ शकतो

  • मुलांच्या अडचणी सोडवण्यासाठी पर्यवेक्षक उपस्थित नसणे

  • प्रत्येक विद्यार्थ्यांची परीक्षेची फी 600 रुपये, तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 300 रुपये असून हजारोच्या संख्येने विद्यार्थी परीक्षांसाठी अर्ज करतात


यावर आता प्रहार संघटना मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन हे पोर्टल बंद करुन पुन्हा सरकारच्या एमपीएससी पोर्टलद्वारेच सर्व परीक्षा घ्याव्यात, अशी विद्यार्थ्यांच्या वतीने निवेदन देणार आहे. तसेच, येत्या 27 सप्टेंबरला पुण्यात, तर 1 ऑक्टोबरला मुंबईत विद्यार्थ्यांसोबत प्रहार संघटना आमदार बच्चू कडू यांच्या नेतृवाखाली आंदोलन करणार आहे.