मुंबई: कोपर्डी बलात्कार प्रकरण आणि त्यानंतर निघालेल्या मोर्चावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केलं आहे. अशा मोर्चातून राजकीय पोळी भाजण्याचा काही नेत्यांचा प्रयत्न होता असं म्हणत शरद पवारांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.


 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

 

मराठा समाजानं शांततेत काढलेल्या मोर्च्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाजाचे आभार मानले. पण अशा घटनांमधून समजात तेढ निर्माण करण्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न काही नेते करत असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. मुख्यमंत्र्यांचा रोख अर्थातच राष्ट्रवादी आणि शरद पवारांकडे होता.

 

आंतरजातीय विवाह पद्धतीला महत्त्व दिलं जावं: आठवले

 

रिपाइं नेते रामदास आठवले यांना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्रिपद मिळाल्यानं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी षण्मुखानंद सभागृहात महादेव जानकर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे उपस्थित होते.

 

कार्यक्रमात सत्कारानंतर रामदास आठवलेंनी आपल्या शैलीत भाषण केलं. या भाषणात त्यांनी आंतरजातीय विवाह पद्धतीला महत्त्व दिलं जावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. शिवाय यापुढे आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना केंद्राकडून अडीच लाख दिले जात होते. त्यात पन्नास हजाराची वाढ करु असं आश्वासनही रामदास आठवलेंनी दिलं आहे.

 

संबंधित बातम्या:

 

रामदास आठवले आहेत ढाण्या वाघ: मुख्यमंत्री



'आठवले कोण आहे, माणसा-माणसाला जोडणारा फोन आहे'