मुंबई: ताडदेव एसआरए प्रकल्पाच्या घोटाळ्यात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना वाचवण्याच्या नादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार तोंडघशी पडत असल्याचं पुन्हा उघड झालं आहे.


प्रत्यक्षात प्रकल्पाचं काम मार्गी लागलं होतं, मात्र आपण प्रकल्पाला स्थगिती दिली होती, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. पण मीडियामध्ये बातमी आल्यानंतरच या प्रकल्पाला प्रत्यक्षात स्थगिती दिल्याचं उघड झालं आहे.

मेहतांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय हेतूने : मुख्यमंत्री

त्यामुळे पारदर्शी कारभाराचा दिंडोरा पिटणारे मुख्यमंत्री मेहतांच्या प्रेमापायी तोंडघशी पडल्याचं चित्र आहे.

मुख्यमंत्र्यांचा दावा आणि वस्तुस्थिती

*मुख्यमंत्र्यांचा दावा – ताडदेव SRA प्रकल्पा स्थगिती दिली.

वस्तुस्थिती- 23 जून 2017 रोजीच गृहनिर्माण विभागाकडून SRA ला मान्यतेचं पत्र

 मुख्यमंत्र्यांचा दावाप्रकल्पाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे SRA घोटाळा झाला असं म्हणणं चुकीचं.

 वस्तुस्थितीSRA घोटाळ्याबाबत मीडियात बातम्या आल्यानंतर, 11 जुलै 2017 कोडी प्रकल्पाला स्थगिती दिल्याचं पत्र उघड

 मुख्यमंत्र्यांचा दावावाढीव एफएसआय नको असं झोपडपट्टीधारकांचं म्हणणं आहे.

वस्तुस्थिती2009 मध्येच वाढीव एफएसआयचा ठराव आल्याची SRAची माहिती



संबंधित बातम्या

विरोधकांनी आरोप केले म्हणून राजीनामा देणार नाही : प्रकाश मेहता 

मेहतांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय हेतूने : मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांना न सांगताच ‘अवगत’ शेरा, प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश