मुंबई : बॉलिवूड गायक मिका सिंह पुन्हा एकदा वादात अडकला आहे. 12 आणि 13 ऑगस्ट रोजी अमेरिकेत होणाऱ्या कॉन्सर्टवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मिकाला खुलं आव्हान दिलं आहे.

मिका सिंहचं पाकिस्तान प्रेम पाहून मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी त्याला थेट आव्हान दिलं आहे. "मिका, आता महाराष्ट्रात माईक पकडून दाखवच," असं ट्वीट अमेय खोपकर यांनी केलं आहे.

https://twitter.com/MNSAmeyaKhopkar/status/893103780622999552

काय आहे संपूर्ण प्रकरण?
येत्या 12 आणि 13 ऑगस्टला शिकागो आणि ह्युस्टन इथे मिका सिंहचा कार्यक्रम होणार आहे. या कॉन्सर्टपूर्वी मिकाने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. 'हमारा हिन्दुस्तान 15 अगस्त को आजाद हुआ था और 14 को हमारा पाकिस्तान आजाद हुआ था,' असं मिका या व्हिडीओत म्हणाला. मिकाचं 'हमारा पाकिस्तान' म्हणणं भारतीयांना खटकलं आहे.

https://twitter.com/MikaSingh/status/892495849267253248

https://twitter.com/noconversion/status/888780103886491648

मिकाचं पाकिस्तान प्रेम पाहून भारतीयांनी त्याच्यावर जोरदार हल्लाबोल केला. या व्हिडीओवर मनसेने त्याला महाराष्ट्रात माईक पकडून दाखवण्याचं आव्हान दिलं.

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर बंदी लादण्यात आली होती. यामुळे करण जोहरच्या 'ऐ दिल है मुश्किल'मध्ये पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला भूमिका देण्यावरुनही मोठा वाद झाला होता. करणचा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी धमकी मनसेने दिली होती. मात्र यानंतर करणने राज ठाकरे यांची मनधरणी करत, हा चित्रपट रिलीज केला होता.