मोदी नव्हे, आधी फडणवीसशी निपटा, मुख्यमंत्र्यांचं सेनेला आव्हान
एबीपी माझा वेब टीम | 07 Feb 2017 03:22 PM (IST)
NEXT PREV
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि गुजरातच्या पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिमटा काढला. शिवसेनेच्या पायाखालची वाळू निसटलीय, त्यामुळं कोणाला बोलवावं हे पाहून मला 'हार्दिक' आनंद होतो आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला. तसंच मोदींच्या आधी देवेंद्र फडणवीसला तरी निपटा असं आव्हानही त्यांनी शिवसेनेला दिलं. उद्धव - हार्दिक यांची पत्रकार परिषद भाजपसोबत मतभेदांबरोबरच टोकाचे मतभेद झाले आहेत., असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकप्रकारे सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत दिले. आज मुंबईत पाटीदार आंदोलनाचा प्रमुख हार्दिक पटेल आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद झाली. यावेळी ते बोलत होते. महापालिकेत युती तुटल्यानंतर आता शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार का?.. असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारला गेला.त्यावर योग्य निर्णय तुम्हाला लवकरच कळवला जाईल,असं उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं. हार्दिक पटेलचं भाजपवर टीकास्त्र उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या पत्रकार परिषदेत हार्दिक पटेलनं भाजपवर टीकास्त्र सोडलं. सध्या देशाची सत्ता वाईट लोकांची आहे.,म्हणून मी मुंबईत चांगल्या लोकांच्या भेटीला आलो असल्याचं त्यानं म्हटलं. दरम्यान, शिवसेनेला पाठिंबा असला तरी प्रचारात सहभागी होणार नसल्याचंही त्यानं स्पष्ट केलं. संबंधित बातम्या