मुंबई: भाजपनं आज मुंबईसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. बाळासाहेब ठाकरेंसोबतच शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक 5 वर्षात पूर्ण करण्याचं वचन देण्यात आलं आहे.


याचसोबत मुंबई पालिकेचे सर्व निर्णय मंत्र्यांच्या घरी नव्हे तर पालिका मुख्यालयात घेण्याचं आश्वासन दिलं आहे. तसंच नगरसेवक आणि कंत्राटदारांना दरवर्षी संपत्ती जाहीर करण्यासाठी कायद्यात बदल करण्याची हमी देण्यात आली आहे.

याशिवाय मुंबईकरांना 24 तास पाणी, झोपडपट्टीवासियांसाठी मुलभूत सोयी,

 भाजपाच्या जाहिरनाम्यातील काही ठळक मुद्दे

  • मुंबईकरांना 24 तास दररोज प्रती कुटुंब 750 लिटर पाणी

  • जे कॅशलेस व्यवहार करतील त्यांना सूट देणार

  • PPP मॉडेलच्या करारांची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत करणार

  • मुंबई क्षेत्रासाठी प्रचलित कायद्यानुसार उपलोकायुक्त पद निर्माण करणार. यामुळे लोकांना अधिकारी विरोधात थेट दाद मागता येणार

  • मुंबईतील हाजी अली दर्ग्याचा विकास आणि सौंदर्यीकरण करणार

  • शिया मुस्लिमांसाठी स्मशानभूमी विकसित करणार

  • मुंबई मराठी साहित्य संमेलन आयोजित करणार

  • मुंबई शहराचे ग्रामदैवत श्री मुंबादेवी मंदिर परिसर विकसित करणार

  • मराठी नाटकांना महापालिकेतील नाट्यगृह सवलतीच्या दरात प्राधान्याने उपलब्ध करुन देणार

  • मुंबईतील अनधिकृत बॅनर्स, होर्डिंग्ज काढून मुंबईला बॅनर फ्री बनवणार

  • प्रत्येक प्रशासकीय विभागात जलतरण तलाव, इनडोअर स्टेडियम उभारणार

  • मुंबईत आगरी - कोळी भवन बनवणार

  • राईट टू पी महिलांसाठी एक किमी परिघात ई टॉयलेट स्वच्छतागृहे उभारणार,माहिती मोबाईल अॅ पवर

  • संयुक्त महाराष्ट्राचा धडा पालिकेच्या शाळेतील शिक्षणात समाविष्ट करणार

  • OC न मिळालेल्या इमारतींना अभय योजना देणार

  • 12, 800 हेक्टर एवढे मोकळे क्षेत्र आहे. 30 टक्के जागा. यामध्ये मुंबईतल्या लोकांची मते विचारत घेऊन खुली मैदानं उभी करणार

  • मुंबईच्या शहर 30टक्के जागा नैसर्गिक जागा आहे याबाबत जनतेकडून सूचना मागवून, थीम पार्क म्हणून जनतेला देऊ

  • कॅन्सर हॉस्पिटल उभारणार

  • 5 नवीन वैद्यकीय महाविद्यालयं तयार करणार

  • नवजात मुलीच्या खात्यात 5 हजार ठेवणार

  • ई कचरा आणि डेब्रिज यांची विल्हेवाट केंद्र तयार करणार

  • मुंबईत 28 लाख नोंदणीकृत वाहने आहेत, एक लाख दशलक्ष लीटर पाणी गाड्या धुण्यासाठी वापरले जाणार. प्रक्रिया केलेले पाणी हे विशेष जागा तयार करत गाड्या धुण्यासाठी पाणी देणार तशी सेवा उपलब्ध करुन देणार