मुंबई : लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर भाजपने राज्यातील विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. भाजपने त्यासाठी 288 पैकी 220 जागा जिंकण्याचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवलं आहे. जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः प्रत्येक मतदारसंघात रथ यात्रा काढणार आहेत.


'फिर एक बार शिवशाही सरकार' अशी देवेंद्र फडणवीस यांच्या रथयात्रेची टॅगलाईन असणार आहे. आपण केलेल्या कामांचा आढावा या रथयात्रेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस देणार आहेत. या रथयात्रेच्या माध्यमातून राज्यातील 288 मतदारसंघात पोहोचण्याचं उद्दीष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं असणार आहे. प्रत्येक दिवशी सहा मतदार संघांमध्ये मुख्यमंत्री फिरणार असल्याची माहिती समोर येत आहे.





रथयात्रा सरकारची असल्यामुळे शिवसेनेचे मंत्री देखील या रथयात्रेत सहभागी होऊ शकतात, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

याआधी गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी देखील अशी रथयात्रा काढली होती. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंग यांनी अशाच प्रकारची रथयात्र काढली होती.