गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री राणेंच्या घरी!
एबीपी माझा वेब टीम | 26 Aug 2017 07:51 AM (IST)
नारायण राणे सध्या भाजपच्या वाटेवर असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राणेंच्या गणपतींचं दर्शन घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
मुंबई : काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरु असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राणेंच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. नारायण राणेंचे पुत्र आणि आमदार नितेश राणे यांनी हा फोटो ट्विटवर शेअर करुन या संदर्भातील माहिती दिली. ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोमध्ये नारायण राणे, देवेंद्र फडणवीस आणि स्वत: नितेश राणे दिसत आहेत. https://twitter.com/NiteshNRane/status/901163819040464897 मुख्यमंत्री फडणवीस काल (शुक्रवार) रात्री नारायण राणेंच्या घरी गेले आणि त्यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याही घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं होतं. नारायण राणे सध्या भाजपच्या वाटेवर असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राणेंच्या गणपतींचं दर्शन घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. संबंधित बातम्या :नारायण राणेंचा भाजप प्रवेश 27 ऑगस्टला?राणेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा आणि नितेश राणेंचा व्हॉट्सअॅप डीपी!