मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानीही बाप्पा विराजमान झाले. नेहमी राजकीय चर्चांनी घेरलेल्या ‘वर्षा’वर, बाप्पाच्या आगमनानं उत्सवाचं वातावरण निर्माण झालं. मुख्यमंत्र्यांसह त्यांची पत्नी अमृता फडणवीस आणि त्यांच्या कन्येनं एकत्रितपणे पूजा केली.
तावडेंच्या घरी गणपती
ढोल ताशांच्या गजरात शिक्षण मंत्री विनोद तावडेंच्या घरी बाप्पाचं आगमन झालं. यावेळी शिक्षणमंत्र्यांनी देखील टाळ वाजवतं बाप्पाची आराधना केली.
पंकजा मुंडेंच्या घरी बाप्पा
राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पालवेंच्या घरी बाप्पा मोठ्या थाटात विराजमान झाले. यावेळी त्यांचं पूर्ण कुटुंबं उपस्थित होते.
अशोक चव्हाणांचा बाप्पा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांच्या घरीदेखील बाप्पा विराजमान झाले.
गडकरींचा बाप्पा
केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरच्या घरीदेखील गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
मनोहर जोशींचा बाप्पा
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशींच्या घरीदेखील बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. मनोहर जोशींचा मुलगा उन्मेष जोशीच्या हस्ते गणरायाची पहिली पूजा पार पडली
सुशीलकुमार शिंदेंचा बाप्पा
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना झाली.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'वर्षा'वर बाप्पाचं आगमन, राजकारण्यांच्या घरी गणरायाचं स्वागत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Aug 2017 02:22 PM (IST)
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानीही बाप्पा विराजमान झाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -