मुंबई : गिरणी कामगारांना लवकरच त्यांच्या हक्काचं घर मिळणार आहे. कारण गिरणी कामगारांसाठी पनवेलजवळील 8000 घरांच्या लॉटरीची घोषणा 15 दिवसात करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. गिरणी कामगार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज बैठक झाली. यात गिरणी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. गिरणी कामगारांसाठीच्या पनवेल जवळच्या ८००० घरांच्या लॉटरीची येत्या १५ दिवसात घोषणा करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी गिरणी कामगारांना दिलं आहे. तसंच गिरणी कामगारांच्या घरासाठी डोंबिवलीजवळील जागा लवकरच म्हाडाला हस्तांतरित करण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी गिरणी कामगारांना दिलं आहे