मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचं महापौर निवासातील हौदात विसर्जन
एबीपी माझा वेब टीम | 15 Sep 2016 04:20 PM (IST)
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या घरच्या बाप्पाचं महापौर बंगल्यातील हौदात विसर्जन केलं. मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यासाठी स्वतः महापौर स्नेहल आंबेकर हजर होत्या. बाप्पाला निरोप देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिवीजाही उपस्थित होत्या. सर्व गणेशभक्तांनी पर्यावरणपूरक विसर्जन करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.