मुंबई : बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग यांच्या संपत्तीवर टाच येण्याची शक्यता आहे. कारण आर्थिक गुन्हे अन्वेशण विभागाला मुख्यमंत्र्यांनी जप्तीच्या कारवाईला हिरवा कंदील दाखवला आहे.
येत्या काळात त्यांच्या अडचणीत भर पडू शकते. उत्पन्नापेक्षा जास्त संपती असल्याचा कृपाशंकर सिंह यांच्यावर आरोप आहे. कुटुंबीयांनी ज्ञात स्रोतापेक्षा 19.95 टक्के इतकी जास्त मालमत्ता जमविल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग यांची मालमत्ता जप्तीसाठी गृह विभागाकडे मालमत्तेवर येणार टाच आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने परवानगी मागितली होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला परवानगी दिली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या आरोपपत्रात काय म्हटलं आहे?
- पत्नी मालतीदेवी यांनी कमॉडिटी मार्केटमध्ये केलेल्या गुंतवणुकीत 37 कोटींचा तोटा
- कृपाशंकर यांचे पुत्र नरेंद्रमोहन यांनी आईच्या नावे ही गुंतवणूक केल्याचं म्हटलं
- नरेंद्र आणि सलमान खान यांच्यातला 25 लाख रुपयांचा व्यवहारी संशयाच्या भोवऱ्यात
- बांद्र्याच्या 2 फ्लॅट्सच्या खरेदीतही नरेंद्रमोहन आणि मालतीदेवींची भूमिका अस्पष्ट. दोन्ही फ्लॅट्स सलमानचे वडील सलीम खान आणि आई सलमा यांच्या नावे
- नरेंद्रमोहन आणि फिल्म निर्माते अनुराग कश्यप यांच्यात पैशाची देवणा-घेवाण. त्यासाठी बनावट स्टँपचा वापर केल्याचा आरोप
- बांद्र्यातील साईप्रसादमध्ये कृपाशंकर यांचं कुटुंब राहतं, त्यातही 3 बेनामी फ्लॅट्स सिंग यांच्या परिवाराकडे
- कृपाशंकर यांची मुलगी सुनीताकडे पवईच्या हिरानंदानी आणि बांद्र्याच्या एचडीआयएलमध्ये फ्लॅट्स
- टी सीरीजचे मालक किशनकुमार यांच्यासह 13 जणांकडून फ्लॅट्सच्या नावाखाली कोट्यवधी घेतले