अभिनेत्री विद्या बालनला डेंग्यूची लागण
एबीपी माझा वेब टीम | 16 Sep 2016 04:06 PM (IST)
मुंबई : मुंबईत साथीच्या तापाने धुमाकूळ घातला आहे. बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनलाही डेंग्यूची लागण झाली आहे. 'कहानी 2' या सिनेमाची शूटिंग करुन नुकतीच अमेरिकेतून परतलेल्या विद्याला कालच डेंग्यूचं निदान झालं. डॉक्टरांनी विद्याला 10 दिवस विश्रांती करण्याचा सल्ला दिला असून तिच्यावर घरीच उपचार सुरु आहेत.