मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घेतला आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 119 टक्क्यांवरुन 125 टक्के होईल.


जानेवारी 2016 ते ऑगस्ट 2016 या कालवधीतील महागाई भत्त्याच्या थकबाकी रकमेपैकी 25 टक्के रक्कम ऑगस्टच्या पगारात जमा होणार आहे. उर्वरित 75 टक्के रक्कम राज्य शासनाच्या नियमांनुसार दिली जाणार आहे.

महागाई भत्त्यातील वाढीव रक्कम सप्टेंबर महिन्याच्या पगारात रोखीने दिली जाणार असल्याची माहितीही परिवहन विभागाने दिली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंददायी वातावरण आहे.