नवी मुंबई : पनवेल महापालिकेच्या सफाई कामगारांनी संप मागे घेतला असला तरी सहा दिवस साचलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त झाले आहेत. ही दुर्गंधी रोगराईला निमंत्रण देणास कारणीभूत ठरु शकते. त्यामुळे लाखो नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.


विविध प्रलंबित मागण्यांसाठी पनवेल महापालिकेच्या सफाई कामगारांनी बुधवार म्हणजे 12 एप्रिलपासून संप पुकारला होता. सलग सहा दिवस कचरा उचलला न गेल्याने पनवेल, खारघरसह महापालिका क्षेत्रातील विविध भागांना डम्पिंग ग्राऊंडचं स्वरुप आलं होतं.

संप मागे घेताच कामगारांनी कचरा उचलण्याचं काम सुरु केलं. मात्र सहा दिवस साचलेला कचरा आणि त्यामुळे सुटलेली दुर्गंधी अद्यापही कायम आहे. शिवाय कचरा पेटी ठेवलेल्या रस्त्यावरही कचरा पसरलेला आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रातीत खारघर, कळंबोली, खांदा वसाहत, कामोठे आणि कळंबोली या सिडको नोडसचा यामध्ये समावेश आहे.  मात्र हे नोड्स अद्याप महापालिकेकडे हस्तांतरीत झाले नसल्याने या भागातील दैनंदिन कचरा उचलण्याचं काम सिडकोकडून केलं जातं.

सिडकोने त्यासाठी 22 कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. या कंत्राटदारांच्या माध्यमातून तब्बल 1300 सफाई कामगार कचरा उचलण्याचं काम करतात. मात्र, प्रलंबित मागण्यांसाठी कामगारांनी बुधवारपासून काम बंद आंदोलन पुकारलं होतं.

संबंधित बातमी :  सफाई कामगार संपावर, पनवेल महापालिका क्षेत्रात कचऱ्याचे ढीग