मुंबई : मुंबईत म्हाडाच्या एका अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं रंगेहाथ पकडलं आहे. म्हाडामधील घर मिळवण्यासाठी 50 हजारांची लाच या अधिकाऱ्यानं मागितली होती.


म्हाडाचे वांद्रे विभागाचे उप. समाज कल्याण अधिकारी संजय काशिनाथ पाटील यांनी ही लाच मागितली होती. तक्रारदारानं 50 हजारांची लाच मागितल्याची तक्रार दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं सापळा रचून संजय पाटील यांना रंगेहाथ पकडलं आहे.तक्रारदार महिलेला म्हाडा गृहनिर्माण प्रकल्पात फ्लॅट मिळाला होता. मात्र वेळेत कागदपत्र सादर न केल्यानं त्यांचं नाव बाद करण्यात आलं.

तक्रारदार महिलेला संलग्न अधिकाऱ्यांकडे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगत फ्लॅट मिळवून देण्यासाठी 50 हजारांची लाच संजय पाटील यांनी मागितली होती.