Raj Thackeray: मुंबई महानगरपालिकेतर्फे शिवाजी पार्क मैदानात सुशोभीकरणाच्या कामावर आक्षेप घेत परिसरातील नागरिक, क्लबचे सदस्य, सामाजिक संस्था आणि मैदानावर खेळणारे खेळाडूंनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. हे काम सुरू असतानाच शिवाजी पार्क मैदानाच्या मधोमध मोठ्या प्रमाणात खडी टाकून रस्ता बनवण्यात आलाय.  यावर मनसे आणि स्थानिक राहिवाश्यांनी आक्षेप घेतलाय. मात्र, प्रत्यक्षात खडीवर मातीचा थर टाकण्यात येणार आहे. हा रस्ता मातीचा आहे. त्या खाली पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी ग्रॅव्हल्स टाकण्यात येतंय. आमचा सुशोभीकरणाला विरोध नाही, मात्र मैदानात कुठल्याही कारणास्तव खडी नको, अशी भूमिका मनसेने घेतलीय. तसेच हे काम करताना स्थानिकांना विश्वासात घेण्यात आलं नाही. त्यामुळं सध्या हे काम थांबवण्यात आलंय. यावेळी महानगरपालिका अधिकारी ही उपस्थित होते.
 
शिवाजी पार्कवर खेळणाऱ्या खेळाडूं आणि क्लबमधील सदस्यांनीदेखील अनेक प्रश्न उपस्थित केले. शिवाजी पार्कच्या मधोमग काँक्रीटचा रस्ता बांधला जात असल्याची चुकीची माहिती पसरवली जात असल्यानं अनेकांकडून कामासंदर्भात आक्षेप घेण्यात आलाय. मात्र, प्रत्यक्षात दगड किंवा खडीवर मातीचा थर टाकण्यात येणार आहे. हा रस्ता मातीचा असून त्या खाली पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी ग्रॅव्हल्स टाकण्यात येतंय.


आंतरराष्ट्रीय मैदानांमध्ये अशा प्रकारची पाणी वाहून नेण्याची व्यवस्था आहे. अगदी त्याचप्रमाणे रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या धर्तीवर संपूर्ण शिवाजी पार्कमध्ये जमिनीखाली परफोरेटेट पाईप्सचं जाळं टाकलंय. पार्कात नव्यानं 36 विहिरी तयार करण्यात आल्या आहेत. या विहिरींचे पाणी गवतावर पाणी शिंपडण्यासाठी तसेच धूळ उडू नये यासाठी वापरण्यात येणार आहे. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha