एबीपी माझाच्या बातमीनंतर ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर वृद्धाश्रमाला आर्थिक मदत करणार
तोक्ते चक्रीवादळानं वसईतील न्यू लाईफ फाउन्डेशन या वृध्दाश्रमाच खुप मोठं नुकसान झालेलं. येथे 29 वयोवृध्द राहतात. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासारख्या अनेक दिग्गज मान्यवरांना ज्यांनी शिक्षणाचे धडे दिलेले. त्या शिक्षिका सुमन रणदिवे यांनी उध्दव ठाकरेंकडे मदतीची याचना केली होती. ती बातमी एबीपी माझाने सर्वात प्रथम दाखवल्यानंतर मनसे आणि शिवसेना तसेच सामाजिक संस्थांनी त्यांना मदतीचा हात दिला आहे.