Uddhav Thackeray Live : शिवसेनेच्या राजकीय इतिहासात प्रथमच अभूतपूर्व संकट निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेला संबोधित केले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांना फेसबुक लाईव्हमधून उत्तर दिले आहे. 


मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमातून आपल्यासमोर बातम्या येत आहेत. ही शिवसेना बाळासाहेबांची आहे का ? शिवसेनेचे हिंदुत्व सोडलं आहे का? नाही शिवसेना मुख्यमंत्री भेटत का नाही ? मुख्यमंत्री भेटत नव्हते. मुख्यमंत्री म्हणजेच मी गेल्या काही दिवसांपूर्वी हे सत्य होतं, याचं कारण ती माझी शस्त्रक्रिया झाली होती. त्याच्या नंतरच्या दोन-तीन महिने मी कोणालाही शक्‍य नव्हतं. त्यामुळे मुख्यमंत्री कोणाला भेटत नाही, हा मुद्दा बरोबर आहे, पण त्याच्यानंतर मी आता भेटायला सुरुवात केली आहे. 



ते पुढे म्हणाले की, माझी पहिली कॅबिनेट मीटिंग हॉस्पिटलमध्ये ऑनलाइन केली होती. शिवसेना आणि हिंदुत्व हे दोन एकमेकांमध्ये गुंतलेले शब्द आहेत. शिवसेना कदापि हिंदू आणि हिंदूत्व कदापि शिवसेनेपासून दूर होऊ शकत नाही आणि शिवसेनाप्रमुखांनी दिलेला कानमंत्र आहे. हिंदुत्व आमचा श्वास आहे, म्हणूनच पंधरा दिवसांपूर्वी आदित्य, एकनाथ शिंदे अयोध्येला गेले. हिंदुत्वाबद्दल मी विधानसभेत विधिमंडळात बोलणारा कदाचित पहिल्या मुख्यमंत्री असेन. 


शिवसेना बदलल्याचे भासवण्याचा प्रयत्न करतात. बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही, पण मी असं काय केलं आहे ? बाळासाहेब 2012 मध्ये वारले. 2014 साठी आपण एकाकी लढत होतो. त्यावेळी आपण हिंदू होतो आणि आजही आहे. एकट्याच्या ताकदीवर प्रतिकूल परिस्थितीत 63 आमदार निवडून आले. आमदार झाल्यानंतर त्यातले काही नंतरचे मंत्री झाले हे सुद्धा शिवसेना बाळासाहेबांनंतरची शिवसेना होती. त्यानंतरच्या आतापर्यंतची वाटचाल आणि मी आता गेली अडीच वर्षे मी स्वतः मुख्यमंत्री आहे. माझ्यासोबत मंत्रिमंडळातील सहकारी ते सुद्धा त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेमधील आहेत. 


जबाबदारी अंगावर आली तर ती जबाबदारी पूर्ण जिद्दीने पार पाडण्याचा प्रयत्न करतो मी शिवसेनाप्रमुखांना दिलेले वचन पूर्ण करणारच हा निश्चय मनाशी बाळगून असतो. त्यावेळेला मी आपल्या समोर आलो होतो आज सुद्धा समोर आलो असल्याचे ते म्हणाले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या