भुजबळांना ठाण्यातील MET चा भूखंड परत करण्याचे आदेश
एबीपी माझा वेब टीम | 31 Jan 2018 05:05 PM (IST)
भूखंड घेतल्यानंतर दोन वर्षात बांधकामाला सुरुवात करणं बंधनकारक असतानाही पंधरा वर्ष सिडकोतील भूखंडावर कोणतंच बांधकाम झालं नाही.
मुंबई : सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना आणखी एक धक्का मिळाला आहे. ठाण्यात सानपाडामध्ये MET साठी घेतलेला भूखंड परत करण्याचे आदेश सिडकोने दिले आहेत. करोडो रुपये बाजारभाव असलेला हा भूखंड महाविद्यालय बांधण्यासाठी 2003 मध्ये कवडीमोल किमतीने विकत घेतला होता. मात्र 2003 ते 2018 या कालावधीत त्यावर कोणतंही बांधकाम झालं नाही. भूखंड घेतल्यानंतर दोन वर्षात बांधकामाला सुरुवात करणं बंधनकारक असताना ही पंधरा वर्ष कोणतंच बांधकाम झालं नाही. बांधकामासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याचं कारण दाखवत भुजबळ कुटुंबीय सिडकोवर दबाव टाकत असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. या कालावधीत संस्थेकडे करोडो रुपयांचा निधी उपलब्ध असल्याचे पुरावे सिडकोला देत कारवाई करण्यासाठी दमानिया यांनी पत्रव्यवहार केला होता.