उल्हासनगर : विकासाचा मुद्दा बाजुला ठेवून भाजप सरकार मंदिर-मशिदीचा मुद्दा घेवून धनाचा धंदा करत आहेत. वाईट याच गोष्टीचे वाटत आहे की यामध्ये सुशिक्षित लोक आंधळे बनत चालले आहेत. हा निवडणूक जुमला असून याकडे लक्ष देवू नका असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. आपल्यासोबत 'मन की बात' आणि अदानी- अंबानीसोबत 'धन की बात' असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बातची भुजबळ यांनी खिल्ली उडवली.
निर्धार परिवर्तनाच्या यात्रेत उल्हासनगरमध्ये ते बोलत होते. यांना मंदिर नाही बनवायचे तर सरकार बनवायचे आहे. म्हणून मंदिर-मशिदीचा मुद्दा घेवून दंगा घडवायचा आहे असा आरोपही भुजबळ यांनी केला. आमचा राजा जास्त उदार झाला आहे. परंतु पुन्हा फसलात तर लक्षात ठेवा तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. आता यांचे अच्छे दिन कमी उरले आहेत असेही भुजबळ म्हणाले.
आज देशावर अशा लोकांचे राज्य आहे जे लोक आदिवासींना आदिवासी नाही तर वनवासी समजत आहेत. आज मनुवादी विचारांचे पुरस्कार करणारे सरकार असल्याची टीकाही छगन भुजबळ यांनी केली. काळा पैसा सापडला नाही परंतु नोटबंदीमध्ये गोरगरीब यामध्ये मरण पावले. ज्याने खेळण्यातील विमानं कधी बनवली नाहीत त्या अंबानीला राफेलची विमानं बनवण्याचा ठेका देण्यात आला. असा आरोपही भुजबळ यांनी केला.
भाजप सरकारचा मंदिर-मशिदीच्या मुद्द्यांआडून धनाचा धंदा : छगन भुजबळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Jan 2019 10:32 PM (IST)
मंदिर-मशिदीचा मुद्दा घेवून दंगा घडवायचा आहे असा आरोपही भुजबळ यांनी केला. आमचा राजा जास्त उदार झाला आहे. परंतु पुन्हा फसलात तर लक्षात ठेवा तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. आता यांचे अच्छे दिन कमी उरले आहेत असेही भुजबळ म्हणाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -