Valet Parking For Passenger :  विमानाचा प्रवास अतिशय सोयीस्कर आणि वेळ वाचवणारा आहे. त्यामुळे अनेकजण विमानाने प्रवास करतात. मात्र विमानतळावर गेल्यावर प्रवाशांना पार्किंग संदर्भात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो.  विमानाचा प्रवास आता प्रवाशांसाठी अधिक सुरळीत होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMI) मल्टि-लेव्हल कार पार्किंग (Multi-level car parking) म्हणजेच व्हॅले पार्किंग सुरू करण्यात आली आहे.  इतके दिवस सीएसएमआय प्रयत्न करत असलेल्या प्रयत्नांना आता कुठे यश आले आहे. या व्हॅले पार्किंगमुळे वाहनतळावर प्रवाशांना धावपळ करण्याची गरज पडणार नाही. प्रवासी टर्मिनल 2 वरील पी 10 वर पोहोचल्यानंतर त्याची वाहने संबंधित व्हॅले साहाय्यकाच्या मदतीने तात्काळ पार्क (Park) करता येणार आहे. यासाठी केवल तुम्हाला विमानतळावरील प्रवेशद्वार क्रमांक 3 व 6 यासमोर असणाऱ्या काउंटरवर जाऊन 300 रूपये देऊन या सेवेचा म्हणजेच व्हॅले पार्किंग लाभ घेता येणार आहे. 


काय आहेत व्हॅले पार्किंगचे फायदे (Benefits Of Valet Parking)


- झटपट पार्किंग करून प्रवाशांचा वेळ वाचवणे
- सुरक्षित पार्किंग
- तात्काळ पिक-अप-ड्राॅप सर्विस
- पार्किंग केलेल्या गाडीची खात्री


विमानतळावर गाड्या या कोणत्याही ठिकाणी आणि कशाही लावल्या जातात. परिणामी वाहतूक कोंडी होते. यावर एक तोडगा म्हणून डिजिटाईज्ड व्हॅले पार्किंग (Digitised Valet Parking) सुविधा सुरू केली आहे. यामुळे गाडी आता कोठे पार्क करावी हा मोठा प्रश्न दूर होणार आहे. शिस्तबद्ध पार्किंगकरीता व्हॅले पार्किंग (Valet Parking) हा उत्तम पर्याय असू शकतो. व्हॅले पार्किंगमध्ये काम करणारे पथक हे अतिशय काळजीपूर्वक तुमची गाडी पार्क करेल. ज्यामुळे तुमचा प्रवास सुखकर होण्यास मदत होईल. सीएसएमआयएने दिवसाच्या संपूर्ण 24 तासाकरीता ही सेवा देऊ केली आहे. कोणतीही चुकीची घटना घडणार नाही याची नियंत्रणा देखील सीएसएमआयएने द्वारे करण्यात आलेली आहे. सीएसएमआयने सुरू केलेल्या व्हॅले पार्किंग सुविधेतून प्रवाशांना अनेक फायदे होऊ शकतात.सतत काही ना काही सीएसएमआय कडून प्रवाशांना सेवा पुरवल्या जात असतात म्हणून सीएसएमआय एक जागतिक दर्जाचा विमानतळ म्हणून आपले स्थान भक्कम करत आहे. प्रवाशांना आधुनिक सुविधा पुरवल्या जात आहेत. व्हॅले पार्किंग सुविधेबद्दल अधिक माहितीसाठी प्रवाशांनी CSMIA's official website ला भेट द्यावी. 


 


इतर महत्वाच्या बातम्या


Sameer Wankhede : समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ? बहुचर्चित कॉर्डिलिया क्रूझवर आले होते एनसीबीनंच जप्त केलेले अमली पदार्थ?