मुंबई : केईएम रुग्णालयाचे नाव बदलून डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालय करण्यात यावं, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे.


मनसेने केईएम रुग्णालयाचे नाव 'डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालय' करण्याबाबत प्रस्तावही ठेवला होता. त्यानंतर आज आनंदीबाई जोशी यांच्या जयंतीनिमित्त मनसेनं पुन्हा मुबंई महापालिकेकडे ही मागणी केली आहे.


दरम्यान, डॉ. आनंदीबाई जोशींच्या जयंतीनिमित्त गुगलने डुडलच्या माध्यमातून मानवंदना दिली आहे.

पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशींचं डुडल, गुगलकडून मानवंदना

आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. त्यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी कल्याणमध्ये झाला.

लग्नानंतर आनंदीबाईंनी वयाच्या १४व्या वर्षी एका मुलाला जन्म दिला. परंतु दुर्दैवाने पुरेशी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने तो केवळ १० दिवसच जगू शकला. हीच खंत आनंदीबाईंना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली आणि आनंदीबाईंनी शिकून डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला.

१८८३ म्हणजे वयाच्या 19व्या वर्षी ‘विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हानिया’मध्ये प्रवेश मिळाला. कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पूर्ण करुन मार्च इ.स. १८८६ मध्ये आनंदीबाईंनी एम.डी.ची पदवी मिळवली.

संबंधित बातम्या :

पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशींचं डुडल, गुगलकडून मानवंदना