“घरातलं दूध आणि भाजीपाला रस्त्यावर कशाला ओतता?” असा सवाल करत दूध रोखणं ही शेतकरी आंदोलनाची पद्धत नसल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. कायदा हातात घेणाऱ्यांना कायद्य़ानुसार शासन होईल असंही चंद्रकांत पाटील सांगायला विसरले नाहीत.
यापूर्वी राजू शेट्टींनी प्रामुख्याने पुणे, नाशिक अहमदनगर वरून जाणारं दूध रोखणार असल्याचे सांगितले होते. तर कर्नाटक , गुजरात, हैद्राबाद वरून मुंबईला येणारं दूध रोखणार असल्याचा इशारा दिलाय. तसेच दूध संघांनी आमच्या आंदोलनाला विरोध करू नये. तसं केल्यास कायदा हातात घेणार असल्याचे म्हटले आहे.
राजू शेट्टींच्या मागण्या
- राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी 400 ते 500 कोटी अनुदान द्या
- गाईचं दूध उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यावर थेट पैसे जमा करा
- गायीच्या दुधासाठी लिटर मागे प्रत्येकी 5 रुपये अनुदान द्यावं