मुंबई : इंजिनिअरिंग आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक सीईटी सेलकडून अखेर जाहीर झाले आहेत. 17 जून रोजी सुरु झालेल्या या प्रवेश प्रक्रियेला नोंदणीच्या वेळी अनेक तांत्रिक अडचणी आल्या होत्या. परिणामी प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर आता या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आलं आहे.
सुमारे चार लाखांहून अधिक विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत होते. सीईटी निकाल जाहीर होऊन 17 दिवस उलटल्यानंतर अखेर काल (23 जून) सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं.
प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
ऑनलाईन नोंदणी - 24 जून ते 30 जून
कागदपत्रे पडताळणी आणि प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज निश्चिती - 25 जून ते 1 जुलै (संध्याकाळी 5 वाजेपर्यंत)
तात्पुरती गुणवत्ता यादी - 2 जुलै 2019
तक्रार असल्यास फॅसिलिटी सेंटरवर तक्रार नोंदवणे - 3 जुलै ते 4 जुलै (संध्याकाळी 5 पर्यंत )
अंतिम गुणवत्ता यादी - 5 जुलै 2019
प्रवेश प्रकियेत सेतू केंद्र रद्द, एसफी केंद्र सुरु
फॅसिलिटी सेंटर तालुकानिहाय सुरु करण्यात आलेली सेतू केंद्र रद्द केली असून त्याजागी आता एफसी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. त्या एफसी केंद्राची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी प्रवेश पूर्ण केले होते आणि पैसे भरले होते ती यादी संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली असून त्यांची नावंही देण्यात आली आहे. त्या विद्यार्थ्यांना पैसे परत केले जाणार असून या नव्या प्रक्रियेत पैसे पुन्हा विद्यार्थ्यांना भरावे लागणार आहेत, अशी माहिती सीईटी सेलचे प्रभारी आयुक्त डॉ. माणिक गुरसाळ यांनी दिली आहे.
इंजिनिअरिंग, व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jun 2019 08:38 AM (IST)
17 जून रोजी सुरु झालेल्या या प्रवेश प्रक्रियेला नोंदणीच्या वेळी अनेक तांत्रिक अडचणी आल्या होत्या. परिणामी प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -