मुंबई : पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील पश्चिम भागातील शेतकरी शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करत होते. पण, सरकारने त्यांना गांभीर्याने घेतले नाही. परिणामी संयम संपल्याने ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी केंद्राची होती. पण, ते अपयशी ठरले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.


दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या काही घटना समोर आल्या आहेत. यावर आता वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर शांततेत आंदोलन करत होते. मात्र, केंद्र सरकारने त्यांना गांभीर्याने न घेतल्याने आज ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. यातही कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी केंद्राची होती. पण, ते त्यात अपयशी ठरल्याचेही पवार म्हणाले.




Sanjay Raut on Delhi Violence: सरकारने ठरवलं असतं तर दिल्लीतील हिंसा रोखता आली असती : संजय राऊत


दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाने एक निवेदन जारी करत म्हटलं की, ज्यांनी हिंसाचार केला त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही. आम्ही हिंसाचाराचा निषेध करतो. दिल्लीत शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि कारवाईबद्दल राज्यातीन नेत्यांनी प्रतिक्रिया देत निषेध नोंदवला आहे.


दिल्लीत नेमकं काय घडलं?
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सिंघू सीमा आणि टिकरी सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी पोलिसांना झुगारुन लावत दिल्लीत प्रवेश केला. ज्यानंतर बराच वेळ हे शेतकरी मुकरबा चौक इथं थांबलेले होते. पण, मग त्यांनी बॅरिगेट आणि सीमेंटचे अवरोधक तोडण्याचा प्रयत्न केला. मुकरबा चौकात पोलिसांनी बेभान शेतकऱ्यांना आळा घालण्यासाठी म्हणून पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला.


Delhi Violence Update: गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक, दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा


काही शेतकऱ्यांनी दिल्ली पोसील मुख्यालयाबाहेर जबाबदारी बजावणाऱ्या पोलिसांवर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न केला. काही वाहनांची तोडफोडही येथे करण्यात आली. पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतरही शेतकरी आंदोलकांनी अतिशय आक्रमक स्वरुपात लाल किल्ला गाठला. इथं त्यांनी मोठमोठ्यानं घोषणा देण्यासही सुरुवात केली.