मुंबई : बदलापूर ते दिवा स्थानकादरम्यान प्रचंड धुक्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. धुक्यामुळे लोकल ट्रेनचा वेग मंदावला आहे.


धुक्यामुळे मध्य रेल्वे तब्बल 15 मिनिटं उशिरानं धावत आहेत. याबाबत रेल्वे स्थानकात घोषणाही सुरु आहे. ऐन गर्दीच्या वेळी लोकल उशिरानं धावत असल्यानं प्रवाशांना बराच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दरम्यान, काल (बुधवार) ठाण्यात पारसिक बोगद्याजवळ मालगाडीचा डबा घसरल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला होता. हा डबा हटवण्यास तब्बल पाच तासांचा अवधी लागला. त्यामुळे घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे बरेच हाल झाले होते. तर आज (गुरुवार) पुन्हा एकदा सकाळी उशिरा धावणाऱ्या लोकलमुळे प्रवाशांचा खोळंबा होत आहे.

संबंधित बातम्या :

मालगाडीचा घसरलेला डबा हटवला, मध्य रेल्वे पूर्वपदावर