Mumbai Local Mega Block : मध्य रेल्वेने NEET UG 2026 परीक्षेला उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रविवार, ३ मे २०२६ रोजी दिवसा कोणताही मेगा ब्लॉक घेण्यात येणार नसल्याची घोषणा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांपर्यंत सहज पोहोचता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून लाखो प्रवाशांना याचा दिलासा मिळणार आहे.

Continues below advertisement

Mumbai Mega Block Update : मध्यरात्री ब्लॉक कायम

दिवसा मेगा ब्लॉक रद्द असला तरी, शनिवार-रविवार मध्यरात्री (२/३ मे) देखभाल आणि अभियांत्रिकी कामांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान मेन लाईनवर आणि ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर लागू राहील.

Train Services Impact Mega Block : कोणत्या सेवा प्रभावित?

मेन लाईन:

रात्री १२.०५ ते पहाटे ५.०५ दरम्यान धीम्या मार्गावरील सेवा वळवण्यात येतील

काही गाड्या जलद मार्गावर वळवून ठराविक स्थानकांवर थांबतील

ट्रान्स हार्बर मार्ग:

ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यान रात्री ११.४५ ते पहाटे ४.४५ सेवा पूर्णपणे बंद

काही गाड्या रद्द करण्यात येणार

NEET Exam Relief : विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा

NEET UG 2026 ही देशातील महत्त्वाची वैद्यकीय प्रवेश परीक्षा असल्याने लाखो विद्यार्थी मुंबई आणि उपनगरातून प्रवास करणार आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वेने घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Central Railway Statement : सुरक्षिततेसाठी कामे आवश्यक

रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही देखभाल कामे अत्यावश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वेने दिलगिरी व्यक्त केली आहे.

ही बातमी वाचा: