मुंबई : मुंबई लोकल प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय घेत पहिल्यांदाच नॉन-AC पण ऑटोमॅटिक दरवाजे असलेली लोकल दाखल होत आहे. मुंब्रा येथील भीषण अपघातानंतर धावत्या ट्रेनमधून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत घोषणा केली होती. ही नवीन लोकल चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) मध्ये तयार करण्यात आली असून ती आता मुंबईकडे रवाना झाली आहे. ही ट्रेन मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल केली जाणार आहे.

Continues below advertisement

Automatic Doors Train Features : लोकलची वैशिष्ट्ये काय?

ही 12 डब्यांची लोकल असून प्रत्येक डब्यात ऑटोमॅटिक दरवाजे असणार आहेत. दरवाजे पूर्णपणे बंद झाल्याशिवाय ट्रेन सुटणार नाही, अशी यंत्रणा यात बसवण्यात आली आहे. त्यामुळे दरवाजात लटकून प्रवास करणं किंवा घाईत चढताना होणारे अपघात टाळण्यास मदत होणार आहे.

Ventilation System : विना-AC असूनही हवेसाठी खास व्यवस्था

ही लोकल एसी नसली तरी प्रवाशांना गुदमरल्यासारखं वाटू नये यासाठी छतावर विशेष वेंटिलेशन सिस्टीम बसवण्यात आली आहे. तसेच हवेचा योग्य प्रवाह राहावा यासाठी लूव्हर्स प्रकारचे दरवाजे देण्यात आले आहेत.

Continues below advertisement

Vestibule Coaches : डबे एकमेकांना जोडलेले

मेट्रोप्रमाणे या लोकलचे सर्व डबे एकमेकांना जोडलेले असणार आहेत. त्यामुळे एका डब्यात जास्त गर्दी असल्यास प्रवासी दुसऱ्या डब्यात सहज जाऊ शकणार आहेत.

Trial Run Update : 2-3 महिने चाचण्या

प्रवाशांसाठी सुरू करण्यापूर्वी या लोकलची 2 ते 3 महिने विविध मार्गांवर चाचणी घेण्यात येणार आहे. RDSO कडूनही सुरक्षा आणि तांत्रिक तपासण्या केल्या जाणार आहेत. सुरुवातीला ही लोकल CSMT-कल्याण मार्गावर प्रायोगिक तत्वावर चालवली जाण्याची शक्यता आहे. चाचणी यशस्वी झाल्यानंतर अशा आणखी लोकल्स मुंबईच्या ताफ्यात दाखल केल्या जाणार आहेत.

Mumbai Local Safety Impact : अपघातांवर लगाम बसणार?

ऑटोमॅटिक दरवाजांमुळे धावत्या ट्रेनमधून पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

ही बातमी वाचा: