मुंबई : खरंतर रोज ‘मरे’ त्याला कोण रडे असं मध्य रेल्वेच्या बाबतीत बोललं जातं. कंटाळलेल्या मध्य रेल्वेच्या चाकरमान्यांचा प्रवास लवकरच निसर्गचित्रांनी नटलेल्या डब्यांतून होणार आहे.
मध्य रेल्वेच्या प्रवाशांना खरंतर इतके सुंदर डबे बघून सुखद धक्का बसणार आहे. लोकलच्या डब्यांना आतून नवीन लूक देण्यात आला आहे. लोकलच्या डब्ब्यांना गुलाबी, हिरव्या रंगांचा वापर करुत निसर्ग चित्र रेखाटण्यात आली आहेत.
सध्या मध्य रेल्वेच्या माटुंगा येथील वर्कशॉपमध्ये लोकलच्या डब्यांना रंग देण्याचं काम सुरू आहे. प्रथम आणि द्वितीय या दोन्ही श्रेणीतील डब्ब्यांसाठी हे बदल असतील. पहिल्या टप्प्यामध्ये दोन डबे रंगविण्यात आले असून लवकरच ते महिला प्रवाशांसाठी सुरू करण्यात येतील. डब्यांना टप्प्याटप्प्यानं रंग दिल्यानंतर लवकरच अजून काही डब्बे प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. येत्या काही दिवसांतच हे नवीन लोकलचे डबे रुळावर धावणार असल्याची माहिती आहे.
लोकलचे डबे नव्या रंगात, नव्या ढंगात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Aug 2018 08:17 AM (IST)
सध्या मध्य रेल्वेच्या माटुंगा येथील वर्कशॉपमध्ये लोकलच्या डब्यांना रंग देण्याचं काम सुरू आहे. प्रथम आणि द्वितीय या दोन्ही श्रेणीतील डब्ब्यांसाठी हे बदल असतील.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -