मुंबई : आज मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे मेगा हाल होण्याची शक्यता आहे. कारण आज मध्य रेल्वेवर कल्याण ते कसारा वाहतूक बंद राहणार आहे. कल्याण ते कसारा दरम्यान सकाळी 11.15 ते 2.45 पर्यंत इंटिग्रेटेड ब्लॉक घेतला जाणार आहे. यादरम्यान रेल्वेवाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे.



या बंददरम्यान अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात येणार आहेत किंवा त्यांची वेळ बदलण्यात येणार आहे किंवा स्थगित करण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान जुना पूल तोडणे, नवीन गर्डर टाकणे, ट्रॅकची दुरुस्ती अशी महत्वाची कामे पूर्ण केली जाणार आहेत.


याशिवाय माटुंगा आणि मुलुंडच्या दरम्यान देखील अप फास्ट मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11.15 ते दुपारी 3.15 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे.


डाऊन मार्गावर सीएसएमटीहून सकाळी 9.12 वाजता टिटवाळासाठी आणि सकाळी 8.33 वाजता कसारासाठी शेवटची लोकल सुटेल. तर दुपारी 1.30 वाजता सीएसएमटीहून आसनगावसाठी पहिली लोकल धावेल.


अप मार्गावर सकाळी 10.37 टिटवाळा-सीएसएमटी, सकाळी 10 वाजता आसनगाव-सीएसएमटी आणि सकाळी 8.18 वाजता कसारा सीएसएमटी या शेवटच्या लोकल धावतील. तर दुपारी 3.35 वाजता टिटवाळा-सीएसएमटी, 2.44 वाजता कसारा-सीएसएमटी पहिली लोकल धावेल.


ब्लॉकदरम्यान ही कामे करण्यात येणार


शहाड स्थानकावरील पादचारी पुलाचा गर्डर तोडण्याचं काम
टिटवाळा स्थानकात पादचारी पुलाचा गर्डर बसवण्यात येणार
आसनगाव स्थानकातील पादचारी पूल पाडण्यात येणार
आसनगाव आणि कसारा स्थानकादरम्यान ऑफलोडेड पोर्टल आणि अँकर स्ट्रक्चलर हटवण्यात येणार


या लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द


51154 - भुसावळ-सीएसएमटी पॅसेंजर
51153 - सीएसएमटी-भुसावल पॅसेंजर
12118 - मनमाड-एलटीटी गोदावरी एक्स्प्रेस
12117 - एलटीटी-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस,
22102 - मनमाड-सीएसएमटी राज्यराणी एक्स्प्रेस
22101 - सीएसएमटी-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस


VIDEO | बातम्या सुपरफास्ट | राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा