मुंबई: मध्य रेल्वेची विस्कळीत झालेली वाहतूक हळूहळू सुरु करण्यात येत आहे.  बदलापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक 20 मिनिटे उशिरा धावत आहे.


रात्री 7.55 च्या सुमारास दादरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर बदलापूरला जाणारी धीमी लोकल आली. मात्र त्याचवेळी झाडाची फांदी ओव्हारहेड वायरवर पडल्याने, स्पार्किंग होऊन ठिणग्या उडाल्या.

त्यामुळे खबरदारी म्हणून तातडीने प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वरील वीज बंद करण्यात आली. त्यामुळे बदलापूरकडे जाणारी वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती.

काहीवेळापूर्वी 8.20 ला बिघाड दुरुस्त करण्यात आला आणि बदलापूर गाडी सुटली. मात्र रखडलेल्या वाहतुकीचा परिणाम त्या मार्गावरील अन्य लोकलवर झाला. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक  20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहे.