मुंबई : मध्य रेल्वेचं रविवार वेळापत्रक अखेर रद्द करण्यात आलं आहे. गाड्या रद्द केल्यामुळे प्रवाशांचा झालेल्या गैरसोयीनंतर मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. परंतु मध्य रेल्वेच्या या तुघलकी कारभाराचा लाखो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.


मुंबईत सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचलं. परिणामी मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. तब्बल 16 तासांनंतर वाहतूक पूर्वपदावर आली. परंतु हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने खबरदारी म्हणून मध्य रेल्वेवरील आजची वाहतूक रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे केली होती.

मध्य रेल्वेवर बुधवारी रविवारप्रमाणे वेळापत्रक, प्रवाशांच्या गैरसोयीची शक्यता

या वेळापत्रकानुसार इतर दिवसांच्या तुलनेत आज कमी फेऱ्या कमी होत्या. मात्र या निर्णयाचा फटका प्रवाशांना बसला. ऐन पिकअवरला मध्य रेल्वेच्या सर्वच स्थानकांवर प्रवाशांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. सकाळपासून लाखो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. मोठ्या प्रमाणात गाड्या रद्द केल्या तर प्रवाशांचा उद्रेक होईल, हे लक्षात आल्यावर आता मध्य रेल्वेने रविवार वेळापत्रक रद्द करण्याचा निर्णय घेतला.