मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेवरील आजचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. मध्य रेल्वेने ही माहिती दिली आहे.

 

गणेशोत्सवाचं वातावरण असल्याने भाविक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात. सुट्टी असल्याने आज गणोशोत्सवाच्या तयारीसाठी तसंच खरेदी करण्यासाठी भाविक प्रवास करण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

एरव्ही दुरुस्तीच्या कामामुळे मुंबईकरांना मेगाब्लॉकचा सामना करावा लागतो. मात्र आज मध्य रेल्वेवरील सर्व लोकल गाड्या आज वेळेत धावतील.