सकाळच्या हेडलाईन्सः

 

  1. मुंबई-गोवा महामार्गावर अंजनारी घाटात विशाल ट्रॅव्हल्सच्या बसला अपघात, 2 जणांचा मृत्यू, 18 जखमी, 2 ते 3 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा


------------------------------------

  1. राज्यातील तब्बल 400 धरणांची स्थिती धोकादायक, 'एबीपी माझा'ने टेमघर प्रकरण बाहेर काढल्यानंतर 'मेरी' संस्थेचा धक्कादायक अहवाल


------------------------------------

  1. घोडाझरी सिंचन घोटाळ्यात अभियंत्यांवर गुन्हा दाखल, तर कोंढाणेप्रकरणी एसीबीकडून तिसरा एफआयआर, तटकरेंच्या अडचणीत भर


------------------------------------

  1. 'आप'चे माजी मंत्री संदीप कुमार यांना अटक, पीडित महिलेच्या तक्रारीनंतर संदीप कुमारांवर कारवाई, आज कोर्टात हजर करणार


------------------------------------

  1. गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या नाशकातल्या डॉक्टर दाम्पत्याला 3 वर्षांची शिक्षा, डॉक्टर अरुण आणि शोभना पाटील पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत दोषी


------------------------------------

  1. मुंबईच्या राजाचं भक्तांना पहिलं दर्शन तर लालबागचा राजा यंदा घुबडावर विराजमान, भक्तांमध्ये शकुन-अपशकुनाच्या तर्कांना उधाण


------------------------------------

  1. आज पोप फ्रान्सिस मदर तेरेसांना संतपद बहाल करणार, देशभरात उत्सवाचं वातावरण, सुषमा स्वराज, ममता बॅनर्जी, केजरीवाल व्हॅटिकन सिटीमधल्या सोहळ्याला उपस्थित राहणार


------------------------------------

  1. युवराज सिंहच्या चॅरिटी युवीकॉन फाऊंडेशनकडून निधीसाठी फॅशन शोचं आयोजन, युवराजसोबत अमिताभ बच्चनही रॅम्पवर, बॉलिवूड कलाकारांसोबत दिग्गज खेळाडूंचाही रॅम्पवॉक