मुंबई : मुंबईत तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा ते मुलुंड स्थानका दरम्यान 10.15 ते 3.15 या काळात मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गावरील चुनाभट्टी ते वांद्रे स्थानका दरम्यान सकाळी 11.21 ते दुपारी 4.39 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
दुसरीकडे पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली ते भाईंदर स्थानकादरम्यान जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येत आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा ते मुलुंड स्थानका दरम्यान जलद मार्गावर सकाळी 10.15 ते दुपारी 3.15 या काळात मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात जलद लोकल स्लो मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. याकाळातील सर्व जलद लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर कुर्ला स्थाकादरम्यान थांबतील.
तर हार्बर मार्गावरील चुनाभट्टी ते वांद्रे स्टेशनदरम्यान सकाळी 11.21 ते 4.39 या काळात मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसटीहून वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या लोकल या काळात बंद राहणार आहेत. तसेच सकाळी 10.38 ते 4.43 याकाळात सीएसटीकडून अंधेरी आणि वांद्रेकडे जाणाऱ्या लोकल फेऱ्याही या काळात बंद असतील.
त्याच प्रमाणे पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली ते भाईंदर या रेल्वे मार्गावर शनिवारी मध्यरात्रीपासून जलद रेल्वे मार्गावर जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे शनिवारी 11.30 ते रविवार दुपार 3.30 या काळात सर्व जलद लोकल स्लो मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.
मुंबईत तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Aug 2017 08:09 AM (IST)
मुंबईत तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील मा 10.15 ते 3.15 या काळात मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गावर सकाळी 11.21 ते दुपारी 4.39 दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दुसरीकडे पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येत आहे.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -