बदलापूर : मुंबईजवळच्या बदलापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची शतक महोत्सवी जयंती भव्य अशी होणार आहे. विशेष म्हणजे या जयंती महोत्सवात सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा भव्य सेट बदलापूर गावात उभा राहत आहे. खुद्द नितीन देसाई यांनी आज (25 एप्रिल) या सेटची पाहणी केली. 


बदलापुरात 2 मे पासून 6 मे पर्यंत सलग पाच दिवस हा महोत्सव चालणार आहे. या जयंती महोत्सवात विविध सांस्कृतिक, क्रीडा, आणि राजकीय कार्यक्रमांची मेजवानी चाखायला मिळणार आहे. या महोत्सवात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थिती लावणार आहेत. शिवाय राज्यस्तरीय कुस्तीचे सामने, जाणता राजा महानाट्य, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर व्याख्यान, शाहीर नंदेश उमप याचे कार्यक्रम असणार आहे. 


महोत्सवात असे असतील कार्यक्रम
- 1 मे रोजी भव्य रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर तसंच यूपीएससी-एमपीएससीच्या मार्गदर्शन शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. 
- तर 2 मे रोजी भव्य मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम असं आयोजन आहे. 
- 3 मे रोजी कुस्ती, कबड्डी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील व्याख्यानाचा कार्यक्रम आहे. 
- 4 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनावर महानाट्य असा दिवसभर कार्यक्रम आहे. 
- 5 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचं लाईव्ह चित्र प्रसिद्ध चित्रकार सचिन जुवाटकर यांच्यातर्फे केलं जाणार आहे. तसंच आनंद सुवर्ण हा कार्यक्रम आहे. - तर 6 मे म्हणजे शेवटच्या दिवशी होम मिनिस्टरचा कार्यक्रम आणि लोकशाहीर नंदेश उमप यांचा मराठमोळा स्नेहसोहळा असा कार्यक्रम आहे. 


या कार्यक्रमाला राज्याच्या विविध भागातून लोक येणार असल्याचे बोललं जात आहे. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 3 मे 1927 रोजी बदलापुरात साजऱ्या झालेल्या शिवजयंतीचे अध्यक्षपद भूषवले होते, त्यासाठी आंबेडकर बदलापुरात आले होते.


इतर महत्त्वाच्या बातम्या