दहीहंडी थराने नाही, तर मिसाईलने फोडायची का? राज ठाकरेंचा सवाल
एबीपी माझा वेब टीम | 24 Aug 2016 05:07 PM (IST)
मुंबई : दहीहंडी थराने नाही, तर आता मिसाइलने फोडायची का? असा सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा लगावला आहे. सण सणासारखा साजरा झाला पाहिजे, या शब्दांत राज यांनी सरकारच्या निर्णयावर टीकास्त्र सोडले. गोविंदा पथकांशी कोणतीही चर्चा न करता राज्य सरकारने घेतलेला निर्णय घेतला, हा निर्णय म्हणजे सरकारचं पळपुटे धोरण असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारने दहीहंडीवर निर्बंध लावताना मंडळांशी चर्चा केलेली नाही. मुंबईतील सर्वच मंडळे मोठे थर लावत नसून, ठराविक मंडळे सरावानंतर हा धाडसी खेळ करत असतात. शिवाय, हा उत्सव साजरा करताना धागडधिंगा होता कामा नये, असेही राज ठाकरेंनी नमूद केलं.