मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा बॉम्बे हॉस्पिटलमधील मुक्काम वादात अडकला आहे. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये छगन भुजबळांना 26 जण भेटल्याचा आरोप होत असतानाच, बॉम्बे हॉस्पीटलचं सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलं आहे.

भुजबळांना कोण कोण भेटायला गेलं होतं?

छगन भुजबळांचा मुलगा पंकज भुजबळ, त्यांची पत्नी विशाखा भुजबळ, समता परिषदेचे कार्यकर्ते बापू भुजबळ, विश्वास सहकारी बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांचा समावेश आहे.

दरम्यान, छगन भुजबळांच्या बॉम्बे हॉस्पिटलमधील मुक्कामावर आक्षेप घेत अंजली दमानियांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे. विराट कोहलीएवढे फीट अँड फाईन असताना भुजबळांना हॉस्पिटलमध्ये ठेवायची गरज काय, असा सवाल दमानियांनी कोर्टात उपस्थित केला आहे. तसंच, भुजबळांना तपासणाऱ्या डॉक्टरांच्या पॅनलमधून तात्याराव लहाने यांना हटवण्याची मागणीही दमानियांनी केली आहे.

या प्रकरणाची सुनावणी 15 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र 15 डिसेंबरनंतर भुजबळांचा मुक्काम जेजेमध्ये असणार की आर्थर रोड कारागृहात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

पाहा बातमीचा व्हिडीओ :