नवी मुंबईत 23 लाख, उल्हासनगरमध्ये 9.76 लाखांच्या नव्या नोटा
एबीपी माझा वेब टीम | 13 Dec 2016 10:26 AM (IST)
नवी मुंबई/कल्याण : नवी मुंबई आणि उल्हासनगरमध्ये लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. नवी मुंबईत तब्बल 23 लाख 70 हजारांची तर उल्हासनगरमध्ये 9.76 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सापडलेल्या सर्व नोटा या दोन हजार रुपयांच्या आहेत. नवी मुंबईतील जप्त रोकड प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आरोपींकडून समाधानकारक उत्तर येत नसल्यानं कोपरखैरणे पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. हंसराज राठोड आणि रमेश गोईल असं ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावं आहेत. उल्हासनगरमध्ये तिघा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. नितीन बडे, शिशी पंजवानी आणि बजाज अशी उल्हासनगर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावं आहेत. तिघांचं वय 30 ते 35 वर्षे वयोगटातील असून ते उल्हासनगरचेच रहिवासी असल्याची माहिती आहे. आंचल प्लाझा बारजवळ पोलिसांनी ही कारवाई केली. पंजवानीकडे सर्वाधिक म्हणजे 6.56 लाख रुपयांची रोकड सापडली, तर बडेजवळ 1.2 लाख आणि बजाजकडे 2 लाखांची रोकड सापडली आहे. आयकर विभाग यासंबंधी अधिक तपास करत आहे.