मुंबईत कॅश व्हॅन लुटीचा प्रयत्न
एबीपी माझा वेब टीम | 23 Nov 2016 07:28 AM (IST)
मुंबई : मुंबईतील वांद्र्यात दोन अज्ञातांनी एक कॅश व्हॅन लुटण्याचा प्रयत्न केला. आयसीआयसीआय बँकेच्या पाली नाका एटीएमजवळ हा प्रकार घडला. मात्र एटीएमच्या सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधामुळे हा प्रयत्न फसला. दोघा अज्ञातांनी सुरक्षारक्षकाला चाकूचा धाक दाखवला, मात्र त्याला न बधता सुरक्षारक्षकाने बंदूक काढल्याने दोघांनीही पळ काढला. अद्याप आरोपींची ओळख पटू शकलेली नाही. नोटांबदीच्या पार्श्वभूमीवर या घटनेला वेगळे महत्त्वा प्राप्त झाले आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांचा शोध सुरु आहे.