मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजविण्यावर निर्बंध लावले. केवळ रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके वाजवावे असे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु न्यायालयाच्या या आदेशांची अनेकांनी पायमल्ली केली आहे. अनेकांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धुडकावत रात्रभर आणि दिवसादेखील फटाके वाजवले. अशा 100 जणांवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली. पोलीस केवळ एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी फटाक्यांच्या 53 दुकानांवरदेखील कारवाई केली आहे.
कारवाईमध्ये काही जणांवर मार्यदित वेळेनंतर फटाके वाजवून नियंमाचे उल्लंघन केल्याची संख्या जास्त आहे. अश्या व्यक्तींवर महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर काही जणांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. मानखुर्दमध्येदेखील पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.