मुंबई : मी हवा पाहुन कोणासोबत जायचं याचा निर्णय घेतो, असे विधान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मुंबईतल्या एका कार्यक्रमात केले आहे. आठवलेचे विधान ऐकूण सभेला जमलेल्या लोकांमध्ये चांगलाच हशा पिकला. काँग्रेसच्या नसीम खान यांनी आठवलेंनी काँग्रेससोबत यावे, असे आवाहन काही दिवसांपूर्वी केले होते. त्याबाबत प्रतिक्रिया देताना रामदास आठवले यांनी हे विधान केले.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री असलेले रामदास आठवले म्हणाले की, ‘'ज्या दिशेने हवा असेल, मी त्या पक्षाला साथ देणार. नसीम खान (काँग्रेस) बोलत आहेत की, तुम्ही आमच्या पक्षासोबत हातमिळवणी करा. यावर मी त्यांना म्हणालो की, मी 10-15 वर्षांपर्यंत काँग्रेससोबत होतो. आता इथेही (भाजप) मला 15-20 वर्षांपर्यंत रहावे लागेल. जोवर भाजपचे सरकार आहे, तोवर मी भाजपसोबत आहे. जेव्हा हवेची दिशा बदलेल तेव्हा अंदाज पाहून मी निर्णय घेईन’’.