मुंबई : डॉक्टरांची बदनामी केल्याप्रकरणी कॉमेडियन सुनिल पालविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कोरोना काळात रुग्णांची दिवस-रात्र सेवा करणार्या डॉक्टरांची बदनामी करणारे व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी कॉमेडियन सुनिल पाल याच्याविरुद्ध अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सुनिल पालने डॉक्टरांविषयी एक व्हिडीओ व्हायरल केला आहे, त्यात डॉक्टरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य तसेच टीका करण्यात आली होती.
एका चॅनेलशी संवाद साधताना सुनीलनेनी डॉक्टर शैतानाच्या वेशात फिरत आहेत, कोरोनाच्या नावाने डॉक्टरांकडून गरीबांना घाबरवले जात आहे. हॉस्पिटलमध्ये बेड, औषध, प्लाझ्मा नाही असे सांगून त्यांचे मानसिक शोषण केले जात आहे. गरीब रुग्णांचा सायंकाळपर्यंत मृत्यू होईल, याची पुरेपुर काळजी घेतली जात आहे, असं वक्तव्य त्याने व्हिडीओत केले होते.
या प्रकरणी डॉक्टरांच्या संघटनेकडून दाखल केलेल्या अर्जानुसार अंधेरी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरूवात केली आहे. लवकरच या प्रकरणाच्या चौकशीसठी सुनील पालला बोलावले जाऊ शकते. ABP माझाशी बोलताना सुनील पालने आपल्या केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे.